Blogs – Page 10 – Vanchit Vikas
Image

फुलवा कथांच्या निमित्ताने / प्रस्तावना

     शरीर विक्रय करणार्‍या महिलांच्या मुलांसाठी  लोहगाव,पुणे येथे इ.स.१९९० मध्ये वंचित विकास संस्थेचे  नीहार’ हे निवासी केंद्र  सुरु झाले. पण इमारत आणि जागेच्या मर्यादेमुळे ’नीहार’ मध्ये  केवळ १०० मुलांनाच प्रवेश  देणे शक्य होते. लालबत्ती विभागात खूप मुले राहतात. काही जवळच्या शाळेत जातात. लहान मुले जेथे आई व्यवसाय करते तेथेच घुटमळत...
By :
Image

यशस्विनी – १२ (ब) / गौरी

     गौरीचे लग्न १४ व्या वर्षी झाले. ती केवळ एक महिना सासरी राहिली. नवऱ्याचे पहिले लग्न झालेले होते. हे गौरीला तिच्या लग्नानंतरच समजले. नवरा दारू प्यायचा, तिला मारहाण करायचा. आणि संशय घेऊन ही मारहाण करायचा. या सगळ्याला कंटाळून ती माहेरी निघून आली.       रंजनाताई यांच्या कडून गौरीला केंद्राची माहिती समजली....
By :
Image

यशस्विनी – १२ (अ) / सीता

     लातूर जिल्हयातील बिबराळ गावाची सीता ४ थी पर्यंत शिकलेली होती. तेराव्या वर्षीच तिचे लग्न झाले होते. सगळे तसे ठीक चालले होते. पण वीजेचा शॉक बसला आणि नवरा वारला. आता सासरच्यांनी आधार दयायचे नाकारले. जेमतेम दीड वर्षे सासरी राहून तान्ह्या मुलीला घेऊन सीता माहेरी परतली.      काही काळाने रंजनाताई यांच्याकडून...
By :
Image

यशस्विनी – ११ (ब)/ इशरत

     आश्चर्य म्हणजे इशरतचे लग्न तिच्या वयाच्या दहाव्या वर्षीच झाले. लग्न,नवरा,सासर,याचा अर्थ तरी या वयात कळतो का? पण झाले लग्न. तिचे आणि नवऱ्याचे सारखे भांडण होत असे. मग नवरा खूप मारहाण करीत असे. या त्रासाला कंटाळून इशरत दोन वर्षातच माहेरी परतली.      काही काळानंतर केंद्रात शिकून गेलेल्या महिलेकडून तिला लातूरच्या...
By :
Image

यशस्विनी-११ (अ) / सायरा

     शिवणकाम शिकायचे तर किमान टेप वरील आकडे तरी कळले पाहिजेत. मापे कळली पाहिजेत. सायरा केंद्रात आली तेंव्हा तिचे काहीच शिक्षण झालेले नव्हते. तिला शाळेत कधी घातलेलेच नव्हते. त्यामुळे तिला केंद्रात गमभन शिकण्या पासून सुरुवात करावी लागली. पण जिद्दीने ती शिकली. कंटाळली नाही. कंटाळून चालणारच नव्हते. तशीच तिची परिस्थिती होती....
By :
Image

यशस्विनी – १० (ब) / शीतल

     ही कहाणी आहे शीतल नावाच्या मुलीची. वयाच्या १२ व्या वर्षीच तिचे लग्न झाले. या मुलीला लग्न,संसार,सासर, याची काय जाण असणार? पण तरीही तिने संसार केला. ती दहा वर्षे सासरी राहिली. या काळात तिला दोन मुले आणि एक मुलगी झाली. आजारपणात नवरा वारला. तिला सासर दुरावले. विधवा शीतल वयाच्या २२...
By :
Image

यशस्विनी-१० (अ) / धोंडी

     कोणी काही बोलले तरीही तोंड उघडायचे सुद्धा धाडस जिच्यामध्ये नव्हते ती धोंडी आज एकटी अन्यायाच्या विरोधात उभी राहते. तिच्यासारख्या अडचणीत सापडलेल्यांना आधार देते, मार्गदर्शन करते. धोंडीमध्ये हा बदल झाला तो सबला महिला केंद्रात शिक्षण घेतल्यामुळे. इतर अनेक मुलींप्रमाणेच धोंडीचे लग्न तिच्या वयाच्या 13 व्या वर्षीच झाले. ती सासरी केवळ...
By :

यशस्विनी ९ (ब ) / हसीना

     “घरात जे शिक्षण मला मिळाले नाही ते लातूरच्या संस्थेत मिळाले.” असे अभिमानाने सांगणारी हसीना खरे तर केंद्रात येण्यास मुळीच तयार नव्हती.      लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या गावात राहणाऱ्या हसीनाचे लग्न तेराव्या वर्षी झाले. सासरी ती ६ वर्षे राहिली. पण नवरा दारुडा होता. तो हसीनाला रोज मारहाण करीत असे....
By :
Image

यशस्विनी -९ (अ)/बालिका

     बालिका असे सांगते,”मी ७ वी वर्ग पास झाले होते. पण मला साधी आडवी रेघ देखील ओढता येत नव्हती.वंचित विकासच्या सबला महिला केंद्रामुळे माझा विकास झाला. आज मी विमा एजंट आहे.”      एवढा बदल झालेल्या बालिकाचे सुरुवातीचे आयुष्य फारच बिकट होते. तिचे लग्न वयाच्या १८ व्या वर्षीच झाले. दोनच वर्षे...
By :

यशस्विनी – ८ / मेहबूबा

     लग्नाच्या वेळी मेहबूबा १२ वर्षांची होती. काय कळते या वयात?  पण लग्न केले गेले. संसाराचा गाडा ओढावा लागला. हा संसार म्हणजे फक्त यातनाच असतात, असे तिला वाटू लागले. नवरा बाहेरख्याली होता. तो तिला सारखी मारहाण करायचा. बायकोला मारायला कारण लागत नाही. आपल्याकडे हे असेच चालते. हिंदू असो की मुस्लीम,...
By :