नवरात्रीचा नववा दिवस मेहेंदी रेखाटनाने साजरा

Event Date : 07-10-2019

नवरात्री उत्सवा निमित्त मृगनयनी मेहेंदी आर्टच्या वतीने जाणीव संघटना,वंचित विकास च्या कार्यालयामध्ये जाऊन तेथील विविध क्षेत्रातील महिलांच्या हातावर मेहेंदी रेखाटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला 🌸

जाणीव संघटना, वंचित विकास संस्थेमार्फत वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.  अतिशय उत्साहाने तसेच आपल्या मेहेंदी कलेच्या माध्यमातून वेगळ्याप्रकारे नवरात्र साजरी करण्याचा हा प्रयत्न होता.

सामाजिक भान ठेवून तसेच परंपरेची जपणूक करून मृगनयनी मेहेंदी आर्टच्या संचालिका सौ.धनश्रीताई हेंद्रे व त्यांच्या सहकारी अनिता ,संजीवनी ,तेजल वांजळे, प्रज्ञा काळे, सोनाली, तेजल गोरे, या मेहेंदी कलाकारांनी मेहेंदी काढली तसेच सर्व महिलांना सुवासिक अत्तर व हळदी कुंकू लावून स्त्री शक्ती सन्मान केला.

वंचित विकासच्या महिलांना मेहेंदी काढून काही आनंदाचे क्षण त्यांच्यासोबत साजरे करायला मिळाले हे आमचे भाग्यच होय. सर्वांनीच अगदी हौसेने मेहेंदी काढून घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला सर्वांना प्रत्यक्षात अनुभवता आला हेच खऱ्या अर्थाने महागौरीपूजन होय, अशी भावना या कलाकारांनी आणि उपस्थितांनी व्यक्त केली.