‘वंचित विकास’चा ज्येष्ठांसाठी कट्टा – Vanchit Vikas

‘वंचित विकास’चा ज्येष्ठांसाठी कट्टा

Event Date : 14-03-2018

‘उतारवयात हरवलेले आनंदाचे क्षण ज्येष्ठ नागरिकांना परत मिळावेत, एकाकीपण दूर होऊन त्यांना हलकेफुलके आयुष्य जगता यावे, यासाठी पुण्यातील जाणीव व वंचित विकास संस्थेतर्फे दररोज सायंकाळी मोफत ‘संध्या कट्टा भरविण्यात येत आहे. नारायण पेठेत भरणाऱ्या या कट्ट्याला ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे,’अशी माहिती वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा व संचालिका मीनाताई कुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी ‘वंचित विकास’च्या देवयानी गोंगले व मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते. ‘अलीकडे विभक्त कुटुंबपद्धती व कार्यबाहुल्यामुळे घरातील तरून मंडळी ज्येष्ठांसाठी वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे या ज्येष्ठांमध्ये एकाकीपणाची भावना निर्माण होते. ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात. परंतु त्यांना संवाद साधण्यासाठी कोणी नसल्याने त्यांना मन मोकळे करता येत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही हा कट्टा सुरु केला आहे,’असे कुर्लेकर म्हणाल्या.
नारायण पेठेतील मोदी गणपती जवळील संस्थेच्या कार्यालयात रोज चार ते सहा या वेळेत चालणार्या या कट्ट्या मध्ये मनमोकळ्या गप्पा, सल्ला व मार्गदर्शन, सुखदु:खाची देवाण घेवाण, मार्गदर्शनपर सत्रे, कलांचे रसग्रहण, समुपदेशन, कायदेशीर सल्ला, सहलीचा आनंद, वेगवेगळी शिबिरे, विविध विषयांवरील वैड्यानिक चर्चा यासारख्या विषयांवर भर दिला जाणार आहे. या कट्ट्या मध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येणार आहे,’ असेही कुर्लेकर यांनी सांगितले.