अरुणा-मोहन गौरव पुरस्कार प्रदान – शनिवार दि २७ जानेवारी २०१८ – Vanchit Vikas

अरुणा-मोहन गौरव पुरस्कार प्रदान – शनिवार दि २७ जानेवारी २०१८

Event Date : 27-01-2018

”सामाजिक कार्याला पैशांची कमतरता भासत नाही. त्या कार्याची आवड आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी असेल तर पैसा उभा राहतो. एखादे चांगले काम केले तर त्यातून मिळणारा आनंद लाखमोलाचा असतो. या आनंदाची अनुभूती प्रत्येक नागरिकाने घ्यावी, असे मत सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रशेखर शेठ यांनी व्यक्त केले.

वंचित विकास संस्थेतर्फे अरुणा-मोहन गाडगीळ या दांपत्याच्या स्मृती निमित्त सामाजिक कार्यासाठी निरपेक्ष वृत्तीने देणगी देणाऱ्या किंवा देणग्या उभ्या करून देण्यास मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांना अरुणा-मोहन गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. यंदा हा पुरस्कार संस्थेच्या श्रीमती शैला टिळक आणि श्री बाळकृष्ण भागवत यांना सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रशेखर शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शेठ म्हणाले,”सामाजिक कार्य म्हणजे खूप अवघड काम असते, असे नाही. प्रत्येक व्यक्ती हे काम करू शकते. इतरांसाठी लहानसे काम करूनही सामाजिक कार्यात सह्भागी होता येते. त्यामुळे प्रत्येकाने चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा.”

”वंचित विकास संस्थेसाठी काम करणे ही नेहमीच आनंददायी बाब असते. यापुढेही जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत संस्थेसाठी काम  करीत राहण्याचे ठरवले आहे. संस्थेमुळे त्याचा विकास झाला, त्यांनी पुढे येऊन संस्थेच्या कार्यामध्ये सहभाग घ्यावा.”

शैला टिळक

श्री बाळकृष्ण भागवत म्हणाले,”समाजामध्ये विश्वास संपादित केला, तर मदत करणाऱ्या हातांची कमतरता जाणवत नाही. यातून मिळणारे समाधान लाखमोलाचे असते. यामुळेच आयुष्याच्या शंभरीपर्यंत वंचित बांधवांसाठी काम करेन, याचा विश्वास वाढतो.”

यावेळी अभया मैत्री गटातील महिलांना देण्यात आलेल्या उद्योजकता प्रशिक्षणातील सहभागी मृणाल शुक्ला, अंकिता गोंगले, धनश्री डोके, जेनी लामा, प्रमिला राय, वैशाली पुरकर, माधवी कुंभार, अनघा खिस्ती, अलका गुंजनाळ, अनुजा पाटील, लीनता साने, रीतारणी शितोळे, पल्लवी वाघ, यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्रीमती देवयानी गोंगले यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती मीना कुर्लेकर यांनी प्रास्ताविक केले.