सुमनताई शिरवटकर पुरस्कृत अभिनय स्पर्धा 2021-
वंचित विकास संस्थेच्या अभिरुची वर्ग आणि फुलवा प्रकल्पातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यावर्षीही सुमनताई शिरवटकर पुरस्कृत अभिनय स्पर्धा घेण्यात आली. कोविडच्या पाश्वर्भूमीवर काळजी घेऊन वेगळ्या पध्दतीने ही स्पर्धा दुपारी 1 ते 5 यावेळेत पुढील ठिकाणी घेण्यात आली. दि. 12 जानेवारी 2021- जनता संस्कुतिक हॉल,जनता वसाहत,पर्वती पायथा,पुणे.दि. 13 जानेवारी 2021- बुध्दविहार,अप्पर...
दीपावली शुभेच्छा !
गुरुवार दिनांक 12 नोहेंबर 2020 रोजी वंचित विकास,पुणे.येथील केंद्र कार्यालयात दिवाळीचे लक्ष्मीपूजन करण्यात आले. तसेच रानवारा मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सौ. स्वाती नातू यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे संस्थापक श्री.विलास चाफेकर,संस्थेचे अध्यक्ष श्री.विजयकुमार मर्लेचा व वंचित विकासचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फुलवा – दिवाळी – 2020
दिनांक 11 नोहेंबर 2020 रोजी फुलवां मध्ये मोठ्या आनंदात व उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मुलांनी बनवलेले आकाश कंदील लावले,किल्ला सजवला,रांगोळ्या काढल्या, मुलांचा आवडता पुरी,बटाट्याची भाजी,श्रीखंड व वरण भात अशा जेवणाचा बेत केला गेला. मुलांना नवीन कपडे दिले. सहज ट्रस्ट तर्फे “चला मोकळे होऊयात” अंतर्गत चित्रकला स्पर्धा सप्टेंबर महिन्यात...
मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शत्रक्रिया शिबीर
डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायण गाव,(पुणे) मोहन ठुसे नेत्र रुग्णालय व संशोधन संस्था नारायणगाव,ता.जुन्नर,जि.पुणे.फोन : (०२१३२ ) २४३१४०,२४४३९८ वंचित विकास आदिवासी जाणीव संघटना आणि देवळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करोनाचे सर्व नियम पाळून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शत्रक्रिया शिबीर शिबिरामध्ये होणारे उपचार व मार्गदर्शन बिनटाक्याची मोतीबिंदू...
सन्मान नवदुर्गाचा-दिवस सातवा – श्रीमती स्नेहल मसालिया
कर्तृत्वशालिनी स्नेहल श्रीमती स्नेहल मसालिया यांचा अभिरुची वर्गाचे संयोजन करणारी कार्यकर्ती ते निर्मळ रानवाराची व्यवस्थापक व कार्यकारी संपादक हा प्रवास अत्यंत कौतुकास्पद आहे. स्नेहल अभिरुची वर्ग व निर्मळ रानवाराचे काम पहाते. अत्यंत गुणी, मितभाषी व कलाकार असलेली स्नेहल मुलांना प्रिय आहे. या कार्यक्रमाला तिचे यजमान श्री सुनील मसालिया उपस्थित...
सन्मान नवदुर्गाचा- दिवस सहावा -डॉ.दीप्ती बच्छाव
घरी आठ वर्षाचा स्वमग्न मुलगा, कामाच्या व्यापामुळे मुलाला अजिबात वेळ देता येत नाही. घरी थकलेले आई वडील, त्यातच पतीला कोरोनाचा झालेला संसर्ग, अशा कठीण परिस्थितीतही एक महिला डॉक्टर कोविड सेंटरमध्ये कोरोनाला चारीमुंड्या चीत करण्यासाठी सज्ज झाल्या. डॉ.दीप्ती बच्छाव असे या रणरागिणीचे नाव आहे. त्या गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेच्या येवलेवाडी...
सन्मान नवदुर्गाचा- दिवस पाचवा – डॉ. नेहा साठे
नवरात्रीनिमित्त डॉ. नेहा साठे यांचा सन्मान स्त्रियांच्या प्रश्नावर व वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी सातत्याने काम करणाऱ्या डॉ. नेहा साठे यांचा दि.२२ ऑक्टोबर २० रोजी डॉ.सुरेखा पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. Acceptance आणि Appreciation या दोन जीवनाच्या महत्वाच्या बाबी आहेत. समोरच्या व्यक्तीला हसून आहे तसे स्वीकारणे हे त्या व्यक्तीला...
सन्मान नवदुर्गाचा-दिवस तिसरा -दीपिका खांडे
दीपिका खांडे सिस्टरच्या सेवा कार्याला सलाम ! कोरोनाच्या काळात घराबाहेर पडायला जिथे लोक घाबरत असत तिथे दीनानाथ मंगेशकरसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे २ वार्ड सांभाळणाऱ्या levitra consegna rapida श्रीमती दीपिका खांडे या तरुण सिस्टरचे कौतुक मंगळवार दि.२० ऑक्टोबर २० रोजी डॉ. विभावरी सरदेशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आपला रुग्णसेवेचा पेशा...
सन्मान नवदुर्गाचा-दिवस चौथा – मीनल कुलकर्णी आणि मयुरी कुलकर्णी
स्त्री पुरुष हे समान दोघे, नाही फरक करणार किंवा मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान असे आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात मुला-मुलींना समानतेने किती जण वाढवतात हा प्रश्नच आहे. दोन्हीही मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांना आपल्या व्यवसायात भागीदार करून घेणाऱ्या चार्टर्ड अकौंटंट श्री जयंत कुलकर्णी यांच्या दोन समर्थ चार्टर्ड...