सहकाऱ्यावरील प्रेम – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/02/9.सहकाऱ्यावरील-प्रेम.jpg

सहकाऱ्यावरील प्रेम

Posted By :

ती आपल्या शेजारच्या खुर्चीत हिशोब करत असते. पावत्यांवर सह्या घेवून त्याची नोंद करत असते. बारीकसारीक गोष्टींचा आर्थिक मेळ साधत असते. ज्या व्यक्तीला आर्थिक मदत हवी आहे तिला योग्य ते प्रश्न विचारून खात्री करून घेत असते. हे सगळं सांगितल्यावर तुमच्या डोळ्यासमोर एखादी टिपिकल हिशोब ठेवणारी व्यक्ती येईल. हो ना?

   सामाजिक संस्था या फंडिंगवर चालत असतात. कार्यकर्त्यांमध्ये कामाचा उत्साह असतो, नवनवीन कल्पना असतात. कुठेही जाऊन धडकण्याची तयारी असते. समाजात काही बदल व्हावेत असं मनापासून वाटत असतं. पण अनेक कामासाठी पैसा लागतो. कार्यकर्त्याचे घर चालण्यासाठी, त्याच्या  दैनंदिन आयुष्यातील किमान गरजा भागण्यासाठी सुद्धा पैसे लागतात. सामाजिक संस्थेत एक पैचा गैरव्यवहार झाला तर सर्व समाज त्यांना बोल लावायला एकत्र येतो. पण तोच समाज ती संस्था जे काम करते त्यासाठी एकत्र यायला मात्र तयार होत नाही. अर्थात हा आजचा मुद्दा हा नाहीच. पण एखाद्या संस्थेत वेळेवर फंडिंग आलं नाही तर काम तर थांबतंच पण जे लोक त्या प्रकल्पासाठी काम करत असतात त्यांचा पगारही थांबतो. अशावेळी ते स्वतःच्या पोटाला म्हणू शकत नाही, “पोटा पगार नाही तर भूक लागू देवू नको.” पोटाला ते कळत नाही.    अशीच वेळ एकदा संस्थेवर आली, वेळेवर फंडिंग आले नाही. ५०-६० लोकांचे पगार कसे करणार? कोण ऐनवेळी आपल्या पाठीशी उभं राहणार. अशावेळी आपलं पोट सुद्धा आपलं ऐकणार नाही, मग बाकीची माणसं तरी का ऐकतील? वेळेवर कोण पैसे देणार? या प्रश्नामुळे झोप उडाली. उद्या काय होणार? कसं होणार? याची कोणतीच उत्तरं कोणाकडेच नव्हती.

दुसऱ्या दिवशी सकाळी जिला आपण टिपिकल म्हटलं असतं. जिला दागिने घालायला खूप आवडतात, ती चेक घेवून आली आणि म्हणाली, “ताई यातून करा सगळ्यांचे पगार”

  “ तू एवढे पैसे कुठून आणले?” ताईंनी विचारलं. कारण तिचीही परिस्थिती ५०-६० लोकांचे पगार एकदम करण्यासारखी नव्हती. तरीही तिने एवढे पैसे आणले. तिला परत परत विचारले तेव्हा तिने सांगितले की, “मी माझे दागिने गहाण टाकले आणि पैसे आणले.”   संस्थेत सगळ्यांना मोठ्ठे आश्चर्य वाटले. काहीजणांनी तर तिच्या समोर दोन्ही हात जोडले. आपण अशा गोष्टी नेहमी इतिहासात वाचल्या आहेत. एखाद्या व्यक्तीच्या कार्यासाठी त्याच्या बायकोने आपले दागिने दिले. पण आमच्यासमोर ही घटना आम्ही डोळ्यांनी घडतांना वर्तमानात पाहिली. खरंच ती सामान्य स्त्री मध्ये लपलेली असामान्य स्त्री होती. तिला दागिने आवडत, पण तिचे तिच्या सहकाऱ्यावर अधिक प्रेम होते.

वंचित cialis 20 mg tablets 4 instructions composition विकास कार्यालय – 7972086730