वंचित विकास कडून लालबत्ती भागात पौष्टिक आहाराचे वाटप – – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2017/12/logo.jpg

वंचित विकास कडून लालबत्ती भागात पौष्टिक आहाराचे वाटप –

Posted By :

ह्या कोरोना महामारीने ह्यावेळी रुद्रावतार धारण केला आहे. समाजातील उपेक्षित घटकांचा विचार करून, दिनांक १६ मार्च पासून वंचित विकास संस्थे मार्फत आपण लालबत्ती भागातील सर्व मुले, गरजू महिला, वृद्ध महिला, अपंग महिला, ए.आर.टी.पेशंट, टी.जी.ह्यांना रोज नियमित गरम, ताजा,आणि पोटभर नाश्ता देत आहोत. करोनाच्या पाश्वभूमीवर हा नाष्टा जास्तीत जास्त पौष्टिक असेल याकडे विशेष लक्ष दिले जाते.संपूर्ण वस्ती मध्ये जाऊन आपण हा नाश्ता देतो, ह्या सर्व ठिकाणी महिलांबरोबर नियमित संपर्क आहे, नाश्ता देता देता मास्क वापरणे,सुरक्षित अंतर ठेवणे, ही जागृतीही करत आहोत. संस्थेच्या कार्यकर्ता तृप्ती फाटक आणि सुशीला कांबळे ह्या संस्थेमार्फत हे काम करत आहेत. सध्याच्या ह्या बिकट परिस्थितीमुळे , त्याचबरोबर आजूबाजूला घडणाऱ्या घटनां मुळे ह्यामधील काही महिला खचून गेल्या आहेत,  त्यांना मानसिक आधार देणे, त्यांचे समुपदेशन करणे हे करत आहोत.एकूण 250 मुले, महिलांपर्यंत आपण रोज पोहोचतो.