“धिटुकली मुलं” – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/03/images-1.jpg

“धिटुकली मुलं”

Posted By :

Blog No.11

      कित्येकवेळा आपण काम करत असतो आणि त्याचे परिणाम नक्की कसे होणार आहेत? ते आपल्याला बघायला मिळतील का? असं वाटत असतं. बालकामगारांच्या क्षेत्रात काम करत असतांना तर असं अनेक वेळा वाटायचं.या मुलांना त्यांचं बालपण उपभोगता येईल का? आपण त्यांच्यासाठी जे करतो आहे,त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही,किंचित तरी फरक पडेल ना? असं काहीबाही मनात येत होतं.पण त्याची एक झलक नुकतीच अनुभवायला आली.

     “ताई,आम्ही शिवाजीनगरला एकट्या जाऊ शकतो.” असं सरला म्हणाली. तेव्हा मला जाणवला तिच्यात झालेला बदल.तिच्यात एकप्रकारचा आत्मविश्वास आला होता.त्या बळावरच अभिरुची वर्गात ती जे काही शिकली होती,ते सर्व ती राजीवनगर मधील मुलांना गोळा करून शिकवत होती. म्हणजे तिने स्वतःच अभिरुची वर्ग आपल्या पातळीवर सुरु केला होता. मुलांच्या राहणीमानात बदल होत गेला. ती मुले स्वच्छ व नीटनेटकी राहू लागली. हा केवढा मोठा बदल आहे! 

  या गटातील मुली कुठेही काम करायला, मदतनीस म्हणून यायला तयार होऊ लागल्या. शिवाजीनगर भागातील मुले कोठेही जाण्यास, तेही गटाने जाण्यास तयार झाली. इतका त्यांच्यात धीटपणा  आणि काम करण्याची वृत्ती निर्माण झाली. शाळेत जाण्याची आवड निर्माण झाली.

    वस्तीतील स्त्रियाही या कामात मदत करण्यासाठी सामील झाल्या. यामुळे त्या त्या वस्तीतले लोक एकत्र येऊन मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करू लागले आहेत. त्या त्या गटातील मुले-मुली त्यांच्या त्यांच्या वस्तीतील प्रश्न समस्या मांडू लागले आहेत.हे सगळं बघितलं की वाटतं समाज आम्हांला मदतीचा हात देत आहे.

वंचित विकास कार्यालय – 7972086730