“छोटंसं रोप” – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/04/Teaching-Big-and-Small-Things-to-Kids.jpeg

“छोटंसं रोप”

Posted By :

पाऊलं टाकू या,फरक पडतो.

शाळेमध्ये मुलींची होणारी गळती हा सर्वसामान्य लोकांचा पेपर मध्ये वाचायचा विषय आहे. अनेकजण तो वाचतात आणि सोडून देतात.पण संस्थेच्या पाटणबोरी येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात जेव्हा सुट्टीला गेलेल्या सगळ्या मुली येत नसत, तेव्हा मात्र आमची घालमेल होई. कारण आत्तापर्यंत शिकलेलं मुली सर्व विसरून तर जाणार नाहीत ना? आईवडील त्यांना दुसरीकडे कामाला तर घेऊन गेले नसतील ना? नाहीतर ही शंका मनात सुद्धा आणायला नको वाटे ,ती म्हणजे एखादीचं लग्न तर लावलं नसेल ना?      ही गोष्ट आहे २०१७ मधली. त्यावर्षी असं काय घडलं? हे आठवलं तरी मनाला फार फार बरं वाटतं. शाळेतल्या गळतीकडे जी व्यक्ती गंभीरपणे बघते आणि त्या घटनेचे नंतर काय परिणाम होऊ शकतात ती व्यक्ती तर त्यावर्षी घडलेल्या घटना ऐकून नक्कीच खुश होईल. झालं असं की

त्यावर्षी दिवाळीत संस्थेच्या पाटणबोरी येथील वसतिगृहातील मुली घरी गेल्या.त्या दरवर्षीच जातात.पण त्या जेव्हा परत येत तेव्हा सगळ्याजणी येत नसत.पण २०१७ मध्ये मात्र आमच्या जेवढ्या मुली घरी गेल्या,त्यातल्या फक्त दोन मुली परत आल्या नाहीत. हा आकडा एकदम उलटा झाला.

  खरंतर या मुली खूप कष्ट घेऊन शिकतात. त्या गावाला घरी जातात तेव्हा, कापूस वेचणीचा हंगाम असतो,त्यामुळे मुली काम करून पैसे मिळवतात.तेवढाच त्यांच्या घराला हातभार लागतो.पैसे मिळायला लागले की शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ शकते.एकतर घरात अनेक अडचणी असतात,त्यातून त्यांना वसतिगृहावर राहून शिकायला मिळणं,हे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असते.खरंतर सुरक्षित वसतिगृहामुळे पालकांचा मुलींच्या शिक्षणाकडे ओढा वाढला आहे आणि त्यांचे लग्नही ते लवकर करून देण्याचा विचार करेनासे झाले आहेत.

   म्हणूनच २०१७ मध्ये सुट्टीला गेलेल्या सर्व मुली परत वसतिगृहात परत आल्या,याचा आनंद खूप मोठा होता.आणि हा आनंद पुढे वाढतच गेला.छोट्याशा कामाने सुद्धा फरक पडतो नाही का? फक्त पाऊलं योग्य दिशेनं टाकायला हवीत. मगच छोट्याशा रोपाचे मोठं झाड होईल,पण त्यासाठी धीर सोडून चालत नाही.

वंचित विकास कार्यालय – 7972086730