आम्हीही माणसंच – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/04/ब्लॉग.jpg

आम्हीही माणसंच

Posted By :

   सहलीचा आनंद कोण घेत नाही? आणि कोणाला सहलीला जायला,तिथं जाऊन आपल्या मनासारखं करायला कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं.पण जेव्हा तृतीयपंथी माणसं जेव्हा म्हणतात की आम्हीही सहलीला जाणार किंवा ते जिथं सहलीला जातात तेव्हा लोक त्यांच्याकडे कसं बघतात तेव्हा मात्र बुचकळ्यात पडल्यासारखं होतं.

    संस्थेच्या कार्यलयात तृतीय पंथी लोकांची मिटिंग होती.त्यात सहलीला जायचं असं ठरलं. खूप जणांना वाटतं की,हे लोक नेहमीच तर रस्तोरस्ती फिरत असतात. यांना काय गरज आहे सहलीची? तसं तर आपणही काही ना काही कारणाने फिरतच असतो,तरी सहलीला जातोच ना? तर ही सहल सारसबागेत घेऊन जाण्याचं ठरलं. सगळेजण-जणी यायला तयार झाले.      पण त्यांच्या मालकिणीला ते कळलं तेव्हा तिला ते आवडलं नाही.तिने सगळ्यांना घाबरवण्यासाठी खूप घाणेरड्या शिव्या दिल्या.पण आम्ही काहीच न बोलता उभे राहिलो. याचाही तिला राग आला. शेवटी ज्यांना ज्यांना सहलीला यायचं आहे त्यांनी यावं असं ठरलं. तेव्हा नऊजणी निघाल्या.

   आम्ही त्यादिवशी सारसबागेत गेलो,पेशवेपार्क मध्ये गेलो.गप्पा मारल्या,भेळ खाल्ली. या सगळ्याजणी इतक्या मोकळेपणे सगळीकडे वावरत होत्या,की त्यांना बघून घरातील लहान मुलाची आठवण यावी.कारण लहानमुल घरातून,चौकटीतून बाहेर पडल्यावर कसा मोकळा श्वास घेत हुंदडत असते. तसेच हे सगळेजण करत होते. खूप खुश होऊन ते म्हणाले, “खूप छान वाटलं,कारण मोकळेपणे माणसासारखं फिरायला मिळालं.”

वंचित विकास कार्यालय – 7972086730