अभया मैत्री गट कार्यशाळेत डॉ. सुरेखा पंडित यांचे मार्गदर्शन (महाराष्ट्र टाइम्स) – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2019/08/Abhayai-Eketepan-MahaTimes.jpg

अभया मैत्री गट कार्यशाळेत डॉ. सुरेखा पंडित यांचे मार्गदर्शन (महाराष्ट्र टाइम्स)

Posted By :

“एकटे आहोत म्हणून खचून जाऊ नका. वस्तुस्थिती स्वीकारून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.” 

वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे ‘एकटेपण पेलताना’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. या कार्यशाळेत मीना कुर्लेकर यांनी एकटेपण समजून घेताना हे सत्र घेतले. डॉ. सुरेखा पंडित यांच्यासह उद्योजिका सिंधू महाडिक, डॉ. सागर पाठक यांनी मार्गदर्शन केले. 

 

आपल्याकडे लग्न हा फार प्रतिष्ठेचा विषय  मानतात. लग्न करणाऱ्या घटस्फोटीत अथवा विधवा अशा एकट्या राहणार्‍या स्त्रियांकडे समाजात वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यांना नानाविध समस्यांचा सामनाही करावा लागतो. पण महिलांनी आपल्या एकटेपणाचा न्यूनगंड न बाळगता मानसिकदृष्ट्या खंबीर राहून या आव्हानांचा सामना करायला हवा असे मत समुपदेशिका आणि मानसशास्त्र अध्यापिका डॉ. सुरेखा पंडित यांनी व्यक्त केले.

 सिंधू महाडिक यांनी आपले अनुभव कथन केले.  त्यांनी संघर्षमय कहाणी सांगितली. एकटेपणा घालवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा संस्थेच्यावतीने नियमित घेण्यात येणार असल्याचे मीना कुर्लेकर यांनी सांगितले.

डॉ पंडित म्हणाल्या, “ एकटे आहोत, म्हणून खचून जाऊ नका. वस्तुस्थिती स्वीकारून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने  पाहा. दैनंदिनी लिहायला सुरुवात करून त्या माध्यमातून व्यक्त व्हायला शिका. आपल्याला ज्यात समाधान वाटेल,  त्या गोष्टी शोधा आणि त्या करा. एकटेपणावर मात करण्यासाठी स्वतःला ओळखायला शिकणे आवश्यक आहे. “

 कार्यशाळेची सांगता वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांच्या मार्गदर्शनाने झाली.  एकटेपणाचे ओझे मानू नये. स्वतःला ज्या गोष्टीत आनंद वाटतो,  त्या गोष्टी कराव्यात. स्वतःवर प्रेम करायला शिकावे, असे चाफेकर यांनी सांगितले.