सन्मान नवदुर्गाचा – दिवस दुसरा -अनुराधा शहा.
सक्षम पालक नसलेली एक मुलगी आईने सांभाळायला एका कुटुंबात दिली. हिच्या वयाच्या १२व्या वर्षी तिला सांभाळणाऱ्या बाईंचे अचानक निधन झाले.तिला घराबाहेर काढले. आणि हिच्या आयुष्याची फरपट सुरु झाली. तिने नर्सिंगचा कोर्स केला. मग १२ वर्ष नोकरी केली. मेमोग्राफी टेक्निशियन म्हणून काम करत असे. त्या किरणांचा तिला त्रास होऊ लागला. म्हणून तिने ती नोकरी सोडली व डबे देणे सुरु केले. कोरोनामध्ये हे सगळे काम थांबले.
तिने नेपाळी माणसाशी लग्न केले आहे. तिला एक मुलगी आहे. ती शिकत आहे.नवऱ्याने तिला त्रास दिला.त्याने ही फसवले. परंतु सत्यावर श्रद्धा ठेऊन प्रवास करणाऱ्या या तेजस्वी स्त्रिचे नाव अनुराधा शहा.
हिचा सत्कार श्री संजय शंके यांच्या हस्ते केला.