फुलवा – दिवाळी – 2020
दिनांक 11 नोहेंबर 2020 रोजी फुलवां मध्ये मोठ्या आनंदात व उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मुलांनी बनवलेले आकाश कंदील लावले,किल्ला सजवला,रांगोळ्या काढल्या, मुलांचा आवडता पुरी,बटाट्याची भाजी,श्रीखंड व वरण भात अशा जेवणाचा बेत केला गेला. मुलांना नवीन कपडे दिले. सहज ट्रस्ट तर्फे “चला मोकळे होऊयात” अंतर्गत चित्रकला स्पर्धा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली होती.त्याचा बक्षिस समारंभ साजरा केला. यात मुन्ना शेख वय 13 वर्षे,स्वामी शेख वय 9 वर्षे सियाम खान वय 10 वर्षे ह्यांना शाळेतील शिक्षिका सौ.पांढरे व डॉ. पेठकर यांच्या हास्ते पारितोषिक देण्यात आले.





