
“मनावरील डाग”
“ ताई,एकदा मुलाचं लग्न झालं की मग मी मोकळे” मीनलताई म्हणाल्या. “ अहो,उलट जास्त अडकाल,मोकळं कसं होणार?” मी म्हटलं. सर्वसामान्य स्त्रिया असं नेहमी म्हणत असतात आणि परत आपल्या दैनंदिन कामात अडकतात. हे माहित होतं.म्हणून मी असं म्हणाले. एखाद्या व्यक्तीची इतरही काही अडचण असू शकते, हे आपल्या लगेच...

“धिटुकली मुलं”
Blog No.11 कित्येकवेळा आपण काम करत असतो आणि त्याचे परिणाम नक्की कसे होणार आहेत? ते आपल्याला बघायला मिळतील का? असं वाटत असतं. बालकामगारांच्या क्षेत्रात काम करत असतांना तर असं अनेक वेळा वाटायचं.या मुलांना त्यांचं बालपण उपभोगता येईल का? आपण त्यांच्यासाठी जे करतो आहे,त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही,किंचित तरी...

“दोन शब्द”
लोहियानगरच्या वस्तीतल्या ऑफिसच्या जागेवर वत्सलाबाई रोज दुपारी येतात. काही ना काही कारण काढून त्या बोलत असतात. सुरुवातीला वाटायचं, त्यांना चहा हवा असणार, म्हणून त्या बरोबर चहाच्या वेळेला येत असतील. पण चहा पिऊन झाला तरी त्या आपल्या जागेवरून हलत नाही. आम्ही रोज लोहियानगरमध्ये कामाला जात होतो. अनेक जणांना आधार...

सहकाऱ्यावरील प्रेम
ती आपल्या शेजारच्या खुर्चीत हिशोब करत असते. पावत्यांवर सह्या घेवून त्याची नोंद करत असते. बारीकसारीक गोष्टींचा आर्थिक मेळ साधत असते. ज्या व्यक्तीला आर्थिक मदत हवी आहे तिला योग्य ते प्रश्न विचारून खात्री करून घेत असते. हे सगळं सांगितल्यावर तुमच्या डोळ्यासमोर एखादी टिपिकल हिशोब ठेवणारी व्यक्ती येईल. हो ना? सामाजिक...

“एक पाऊल स्वतःकडे”
तिथं जमलेल्या सगळ्याजणींना काही ना काही काम करायचं होतं. व्यवसाय करायचा होता. कोणाला शेळ्या पाळायच्या होत्या, कोणाला शिवण मशीन घ्यायचं होतं,कोणाला कापड दुकान चालवायचं होतं तर कोणाला पापड,शेवया याचं मशीन घ्यायचं होतं.प्रत्येकजण आपल्या मनात एक व्यवसाय ठरवून आली होती. या सगळ्या ४०-५० शीच्या स्त्रिया होत्या. घराची जबाबदारी त्यांच्यावर पडली...

सगळी कामं सगळ्यांची
“madam तुम्ही काय बी बोलताय” पराग आपल्या तोंडाला हात लावत हसत म्हणाला. त्याच्या बरोबर त्याचे मित्र सुद्धा, “असं नसतंच कधी” असं म्हणत मला समजावत होते. मराठवाड्यातल्या एका छोट्या गावातल्या शाळेत ७-८ वर्षांच्या मुला-मुलीबरोबर गप्पा मारत होते. गोष्ट सांगून झाली,वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळून झाले तरी त्यांना अजून काहीतरी करायचं...

चाकोरीतून सुटका
Blog No.6 ती दवाखान्यात आमच्या समोर येवून बसे आणि विचारे, “तुम्हांला हे माहित आहे का? किंवा म्हणे, अहो बघा ना तिथं अशी पद्धत आहे. किंवा असं म्हणे, “ आजकाल लोकांची रीतच बिघडली आहे.” आपण यावर प्रश्नार्थक चेहरा केला तर मात्र तिचा उत्साह आणखीन वाढायचा. त्या त्या दिवशी काय काय घडलं...

निखळ मैत्र हवं
Blog No.4 सोनाली सहज भेटायला आली.ती अशी अधूनमधून तिच्या कामातून मोकळी झाली की भेटायला,तिच्या क्षेत्रातल्या गंमतीजंमती सांगायला येत असे.ती आली की आजूबाजूचे वातावरण अजूनच उत्साही होत असे. सोनालीकडे उत्तम fashion सेन्स आहे.ती स्वतः एवढी छान राहतेच,पण दुसऱ्याला सुद्धा तसं राह्यला भाग पाडते. इतक्या हसऱ्या,बोलक्या आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणाऱ्या व्यक्तीला...

खरा संवाद….
Blog No.4 "काय झालं सुमती ताई?" यावर त्यांनी फक्त तोंड फिरवून घेतलं. त्यांच्या मनात काहीतरी बोचत होतं,कशाची तरी त्यांना खंत वाटत होती हे नक्की.पण कशाची हे मात्र कळत नव्हतं. सुमती ताईंनी आपलं करियर स्वतःच्या हिंमतीवर घडवलं होतं,असं म्हणण्यापेक्षा आपल्या बुद्धीच्या जोरावर घडवलं होतं असं म्हणणं जास्त संयुक्तिक होईल.त्यांना...

संवादी बनूया…..
घरातल्या माणसांची आपल्याला खूप सवय असते.त्यामुळे ती आपल्या भोवती असे पर्यंत आपल्याला त्यांचे अस्तित्व लक्षात येत नाही.पण ती कुठे गावाला गेली किंवा काही आजारामुळे आपल्याला सोडून गेली की आपण बैचेन होतो. समीर जेव्हा संस्थेत आला तेव्हा असंच त्याचं काहीसं झालं होतं. समीरने एक दिवस संस्थेत आर्थिक मदत देण्यासाठी फोन...