
आंतरराष्ट्रीय बालिका दिवस
भेदाभावाच्या पलिकडे जाऊन बालिकांना देऊया एक सुरक्षित, शाश्वत आणि सुंदर भविष्य जे दिशा देईल त्यांच्या खंबीर जीवनाला. आंतरराष्ट्रीय बालिका दिनाला संकल्प करूया, त्यांनाही सन्मानाने वाढवूया.वंचित विकास महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम राबवित असते. आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी २०२३ हा एक असाच उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याद्वारे महिला उद्योजकांना त्यांचे...

जागतिक मानसिक स्वास्थ दिवस
आपलं मनं ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. चांगलं जीवन घडविण्याची ताकद फक्त सकारात्मक विचारांमध्येच आहे. म्हणूनच शरिरासोबत मानसिक आरोग्याची काळजी घेणेदेखील आवश्यक आहे.महिलांमध्ये अनेक कलाकुसर करण्याची क्षमता असते. अनेकजणी महिला उद्योजक असतात. त्या सर्वांसाठी वंचित विकास आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी २०२३ हा उपक्रम घेऊन आले आहेत. याद्वारे महिला उद्योजकांना...

माणुसकीचे दर्शन….
एका स्वस्थ समाजाची निर्मिती करायची असेल तर समाजात शांतता व सौहार्दपूर्वक वातावरण हवे. सध्या जगात रशिया-युक्रेन युद्ध असो, ब्राझील मधील राजनीतिक सत्ता हस्तांतर हिंसाचार असो, अरब देशातील अशांतता, इस्राइल-पॅलेस्टाईन पुन्हा युद्ध सदृश्य परिस्थिती असो, पाकिस्तानातील महागाई, राजकीय अस्थिरता, माणुसकीला काळीमा फासणारी गव्हाच्या अवघ्या काही किलोच्या पिशवीसाठी पाशवी मारामारी असो. कोठेही...

जीवन त्यांना कळले हो…………
माझ्या हातात एक लक्ष रुपयांचा धनादेश त्यांनी सुपूर्द केला. मी थक्क झाले. वास्तविक एक लक्ष रुपये कितीतरी देणगीदार संस्थेला देत आले आहेत पण हे जरा वेगळं आणि विशेष होतं. माझ्यासमोर माधवराव आणि सुशीलाताई हे वयस्कर, मध्यमवर्गीय पती-पत्नी बसले होते. माधवरावांनी बोलायला सुरुवात केली. “अहो! आता खरंच कशाचीही गरज उरली...

‘वंचित विकास’ डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला एक दुवा
Blog No.20 ही गोष्ट आहे शंकरदादा गंगावण्यांची. शंकरदादा आता ब्याण्णव वर्षांचे आहेत. डायस प्लॉट या पुण्यातल्या वस्तीत ते आणि त्यांची दोन मुलं असे रहातात. पूर्वी तरुणपणात आणि त्यानंतरही झेपत होतं तोवर दादा ओझी उचलण्याची कामं करायचे. आता या वयात होत नाही आणि प्रयत्न केला तरी काम मिळत नाही. हळूहळू त्यांची...

सुखाचा वारा
सुरेखा ताई, खरं तर त्यांना आजीच म्हणायला हवं या वयाच्या त्या आहेत. नावाप्रमाणेच सुरेख,कुठेही तसूभर जास्तीचे मास नाही.चापूनचोपून नेसलेली साडी,केस नीटनेटके त्यांना शोभतील असे बांधलेले आणि चेहऱ्यावर असं हसू की जगात सगळ्यात सुखी त्याच आहेत. त्यांचं हे देखणं रूप कोणावरही छाप पाडेल असं असलं तरी त्या कधीही आपल्या...

‘हे होऊ शकतं’
कोणासाठी काहीतरी विधायक करत राहणे म्हणजे जीवन होय. असं आपल्यातल्या बहुसंख्य लोकांना वाटत असेल.पण ते प्रत्यक्षात करायचं म्हटलं की अडचणींचा हिमालय ते दुसऱ्या समोर क्षणार्धात उभं करतात. त्यात वेळ नावाची गोष्ट तर कोणाकडेच उपलब्ध नाही,शिवाय पैसा तो तर मुळीच नाही. अशा वेळी आठवण येते ती डोंबिवलीच्या भागवत काकांची. त्यांच्याकडे एवढा...

‘अभया’ माझी मैत्रीण
‘मला वैधव्य आलं,पण तेव्हा नोकरी करत होते, त्यामुळे काही जाणवलं नाही,माझा मुलगा,सून दोघंही चांगले आहेत.पण कामाच्या निमित्ताने त्यांना उपनगरात रहावं लागतं,म्हणून त्यांच्याशी रोज भेट होत नाही. त्यामळे मला फार एकटं वाटतं,भावनिकदृष्ट्या तर खूपच एकटं वाटतं.” ‘मला शिवणकाम, भरतकाम, वीणकाम, यांची आवड आहे, मी करतेही छान. पण माझा नवरा,सासू यांना...

आम्हीही माणसंच
सहलीचा आनंद कोण घेत नाही? आणि कोणाला सहलीला जायला,तिथं जाऊन आपल्या मनासारखं करायला कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं.पण जेव्हा तृतीयपंथी माणसं जेव्हा म्हणतात की आम्हीही सहलीला जाणार किंवा ते जिथं सहलीला जातात तेव्हा लोक त्यांच्याकडे कसं बघतात तेव्हा मात्र बुचकळ्यात पडल्यासारखं होतं. संस्थेच्या कार्यलयात तृतीय पंथी लोकांची...

“छोटंसं रोप”
पाऊलं टाकू या,फरक पडतो. शाळेमध्ये मुलींची होणारी गळती हा सर्वसामान्य लोकांचा पेपर मध्ये वाचायचा विषय आहे. अनेकजण तो वाचतात आणि सोडून देतात.पण संस्थेच्या पाटणबोरी येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात जेव्हा सुट्टीला गेलेल्या सगळ्या मुली येत नसत, तेव्हा मात्र आमची घालमेल होई. कारण आत्तापर्यंत शिकलेलं मुली सर्व विसरून तर जाणार नाहीत ना?...