Priya Sir – प्रिय सर – Vanchit Vikas
https://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/08/Cover-Priy-Sir-7x9-1-1.jpg

प्रियऽऽऽ सर,

तुमच्या आठवणींचं पुस्तक काढायचं ठरलं. पण असं वाटलं की, ज्यांना विसरलोच नाही त्यांची आठवण कशी काढणार?

एक मात्र खरं की, सध्या आपली प्रत्यक्ष किंवा फोनवर भेट होत नाही. नेहमी पायाखालचा असणारा तुमच्या घराचा रस्ता अनोळखी झालाय. तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे कार्यालय माणसांनी भरून राहिलंय. भेटायला येणाऱ्यांची सतत वर्दळ असते. खरोखर दिवसभर उसंत नसते. पण तुमची खुर्ची मात्र… रिकामी असते.

नीहारवर तुमची खोली आहे. सगळं सामान तुमच्या पद्धतीनं लावलंय. पण तुम्ही काहीच प्रतिसाद देत नाही…

आपली ओळख आहे, नातं आहे, कुटुंब आहे,

का आपण एकच आहोत?

पु.ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे,

रोज आठवण यावी असं काही नाही.

रोज भेट व्हावी असंही काही नाही.

एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही…

पण आम्ही तुम्हाला विसरणार नाही. तुमच्या मार्गावरून चालत राहू.

हा तुमचा आमच्यावरचा विश्वास. आपली प्रत्यक्ष भेट कधी होणार ?… शेवटी काय भेटी नाही झाल्या, तरी गाठी बसणं महत्त्वाचं. ज्यांनी हे जाणलं, त्यांनी माणसांतलं माणूसपण जाणलं.. आणि तुम्ही तर केवळ माणसातल्या माणूसपणासाठी आयुष्य वेचलं.

तुमची,

सुनीता आणि मीना