
” या समाधानाच्या क्षणी
आठवण येतेय त्यांची,
ज्यांनी परिस्थितीमुळे
अगतिक होऊन
खिडकीच्या चौकटीत
बाजार मांड लाय
स्वतः सजवलेल्या देहांचा,
त्या मातांची.
आठवण सदोदितच ताजी आहे.
त्यांना मुक्त होण्यासाठी
संधी मिळवून द्यायचीय
कधीतरी…. केव्हातरी…..
ते खूप लांबचं स्वप्न
तोपर्यंत
त्यांची proviron e levitra आठवण मनात ताजीच राहील.”
महादेवी वर्मांचं एक हिन्दी खण्ड काव्य आहे-
“नीहार”.
शब्द संस्कृतातला
पण फार छान.
भावला.. आवडला.
त्याचा अर्थ आहे दवबिंदू.
हिंदीत ओसकण. इंग्रजीत ड्यू ड्रॉप्स.
वेश्यांची मुलं. खरं तर इतरांसारखीच ही मुलं.
पण उपेक्षित. त्यांच्या आयांसारखीच.
त्यांना जगण्याची, फुलण्याची संधी हवी.
दवाचा एक थेंब
कमळाच्या पानावर पडला तर
तो मोती बनतो. पानाचा आधार नसला
तर मातीत मुरून जातो.
ही मुलं, त्या दवबिंदूसारखीच.
एखाद्या संस्थेचा आधार मिळाला तर मोत्यासारखी चमकतील.
नाही, तव मातीत पडून माती बनतील.