दर महिन्याच्या १६ तारखेला ‘प्रवाही’ प्रसिद्ध होतो. यावेळच्या म्हणजे फेब्रुवारीच्या १६ तारखेस मी ही पुस्तिकाच ‘प्रवाही’च्या फेब्रुवारीच्या अंकाऐवजी आपल्या हाती धडधडत्या अंतःकरणाने देत आहे.
धडधडत्या अंतःकरणाने मी अशासाठी म्हटलं, की, या पुस्तिकेच्या रूपाने पुढील २५ वर्षात काय करायला हवं, त्याचा कार्यक्रमच मी देत आहे. कोणाला हा खुळेपणा वाटेल, कोणाला स्वप्नरंजन वाटेल. कोणी वाचणारच नाही, कोणी वाचून ठेवून देईल, क्वचित कोणी हे सर्व ठीक आहे हो, पण हे होणार कसं?’ असं म्हणून सुस्कारा सोडेल.
उपेक्षा सहन करण्याची मला सवय आहे. पण मी कधी निराश होत नाही, भरपूर आत्मविश्वास आहे मला. मी जागेपणी स्वप्न पाहतो. ती वास्तवात आणण्यासाठी जिवाचं रान करतो.