लाम्बा-सुंचूवारयांना सुकृत पुरस्कार प्रदान – लोकसत्ता
Event Date : 16-05-2018
वंचित विकास संस्थेतर्फे दरवर्षी हिंसा आणि गुन्हेगारीच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस दिला जाणारा शुभदा-सारस्वत पुरस्कृत सुकृत पुरस्कार विष्णू लाम्बा आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास सुंचूवार यांना प्रदान करण्यात आला.ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर,वंचित विकासचे संस्थापक विलास चाफेकर, अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा,संचालिका सुनीता जोगळेकर,मीना कुर्लेकर,देवयानी गोंगले या वेळी उपस्थित होत्या.वृक्षचोर ते वृक्षवल्ली (Tree Man) असा प्रवास करणाऱ्या विष्णू लाम्बा आणि विदर्भ-मराठवाड्यातील कैद्यांना तुरुंगात जाऊन मन:परिवर्तन करणाऱ्या श्रीनिवास सुंचूवार यांना यंदाचा सुकृत पुरस्कार प्रदान करण्यात आला.