
मथुराबाई राजहंस कृतज्ञता पुरस्कार – 2020-21
सप्रेम नमस्कार,दोन वर्षापूर्वी राजहंस कुटुंबियांतर्फे कृतज्ञता पुरस्कार देण्यास सुरुवात केली.पहिला पुरस्कार २०१९ मध्ये चिखलगावच्या लोकमान्य सेवा न्यासच्या डॉ.राजा दांडेकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आला. मागील वर्षी कार्यक्रम होऊ शकला नाही.या वर्षीचा पुरस्कार विलास चाफेकर यांनी स्थापन केलेल्या ‘वंचित विकास’ या संस्थेस देण्यात येणार आहे.संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर...

राष्ट्रीय बंधुता संमेलन पुढे ढकलण्यात आले
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे २५ फेब्रुवारी २०२१ रोजी तळेगाव येथे होणारे २२ वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.🙏 बंधुताचार्य प्रकाश रोकडेसंस्थापक अध्यक्षराष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे

सुकृत पुरस्काराचा कार्यक्रम –
शनिवार दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी एस.एम.जोशी सोशलिस्ट फौंडेशन,पुणे येथे वंचित विकास आयोजित सुकृत पुरस्काराचा कार्यक्रम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला आहे, तसदीबद्दल क्षमस्व.

मथुराबाई राजहंस क्रुतज्ञता पुरस्कार
पुरस्कार वितरण - सुनीताताई/मीनाताई यांस, सप्रेम नमस्कारदर वर्षी राजहंस कुटुंबियां तर्फे आम्ही मथुराबाई राजहंस क्रुतज्ञता पुरस्कारसामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला देत असतो.या वर्षीचा पुरस्कारवंचित विकासला देण्याची आमची इच्छा आहे.कार्यक्रम आमच्या घरी रविवारी सातमार्चला करावा असं वाटतय.आपण हा पुरस्कार स्वीकारल्यास आम्हाला आनंद वाटेल.आपण स्वीकाराल का? आपलायशवंत राजहंस९३२५४०४९७१

‘सुकृत पुरस्कार’ 2020-21
एका अगदी वेगळ्या कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण - जाणीव व वंचित विकास संस्थेतर्फे हिंसा आणि गुन्हेगाराच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तिस वा संस्थेस 'सुकृत पुरस्कार' दिला जातो. 2020-21 या कार्यक्रमासाठीची निमंत्रण पत्रिका सोबत जोडली आहे.तरी आपण आपल्या मित्रपरिवारासह अवश्य यावे ही विनंती.

सखी सह्याद्री- “अभया”- सबलांचा प्रवास
दूरदर्शन पुणे प्रस्तुत, सखी सह्याद्री- "अभया"- सबलांचा प्रवास ह्या विशेष कार्यक्रमात वंचित विकासच्या कार्यवाह व संचालिका श्रीमती मीनाताई कुर्लेकर यांची मुलाखत आज मंगळवार 2 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2.00 वा. खूप छान झाली.या कार्यक्रमाची video link सोबत जोडली आहे. याचे पुन:प्रसारण रात्राै 11.00 आणि मध्यरात्री 1.30 आणि पहाटे 4.30 वा...

अभया गटाचा तिळगुळ समारंभ
दिनांक 17 जानेवारी 2021 रोजी 4.00 ते 7.00 या वेळात अश्वमेघ हॉल कर्वे रोड पुणे.येथे संपन्न झाला.लोंकडाऊन मुळे दहा महिन्याच्या प्रतिक्षे नंतर प्रत्यक्ष एकमेकांना भेटताना सर्वजणी खूप भावूक झाल्या होत्या.

वि. ल. शिंत्रे स्मृती कथा स्पर्धा
सस्नेह नमस्कारनिर्मळ रानवारा या मासिकातर्फे वि. ल. शिंत्रे स्मृती कथा स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील बक्षिस पात्र कथा खास तुमच्यासाठी. https://photos.app.goo.gl/jUsRkKGSaD39388q6

‘सेवा सन्मान’ सोहळा 2021
द.इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबच्या वतीने आज शुक्रवार दि.22 जानेवारी 2021 रोजी अश्वमेघ हॉल, कर्वे रोड,पुणे येथे सकाळी 11 वाजता ‘सेवा सन्मान’ सोहळा 2021 पार पडला. यामध्ये आपल्या कार्यकर्त्या श्रीमती मिनाक्षी नवले यांचा सन्मान करण्यात आला. मिनाक्षीताई नवले यांचे मनापासून अभिनंदन!