
गणेश मंडळातील तरुणांना आव्हान
नुकताच वंचित विकासच्या दवाखान्यात एक कार्यक्रम झाला, भाऊबीजेचा. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी. पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने त्यासाठी आले होते. शरिरविक्रय करणाऱ्या काही स्त्रिया गरत्या बायकांप्रमाणे नटून आल्या होत्या. त्यांनी या भावांना ओवाळले. दोन पोलिस सब इन्स्पेक्टरही आले होते.. त्यांनाही या बहिणींनी ओवाळले. सर्व भावांनी या अनोख्या...