Yashaswini – Vanchit Vikas
https://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/08/yashwini.jpg

वंचित विकास, लातूर मध्ये विधवा व परित्यक्तांच्या पुनर्वसनासाठी सबला महिला केंद्र गेली २० वर्षे चालवत आहे. २०१०-११ मध्ये वंचित विकासचा रौप्यमहोत्सव साजरा झाला. त्यावेळी सबला महिला केंद्रात प्रशिक्षण घेऊन गेलेल्या काही महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांच्या यशोगाथा समाजापुढे ठेवाव्यात असा विचार होता. प्रत्यक्ष मुलाखती २०१० मध्येच घेण्यात आल्या. परंतु त्यावरील पुस्तिका त्यावेळी प्रकाशित करता आली नाही. ती पुस्तिका आत्ता प्रकाशित करीत आहोत. यशस्विनींच्या या मुलाखती समाजासमोर सादर करताना मनस्वी आनंद होत आहे.