काही तरी केलं पाहिजे.
पण काय करायचं?
राजकारण तर नको, गलिच्छ क्षेत्र ते.
त्यात कोण पडणार?
मग काय करायचं?
कसं करायचं?
…. अनेक तरुणांच्या तोंडून ऐकलेले हे संवाद.
‘काही तरी केलं पाहिजे’ असं वाटणाऱ्या अनेकांच्या मनात
हेच प्रश्न घोळत असतात.
महाराष्ट्रात सामाजिक कार्य करणा-या संस्था बऱ्याच आहेत.
कार्यकर्तेही बरेच आहेत.
त्यांच्या कामाबद्दल बराच आदर तरुणांना वाटतो.
म्हणून समाज परिवर्तनासाठी धडपडणा-या
विविध कामांची ओळख देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलाय.
यातून कदाचित प्रश्नांची उत्तरं सापडतील.
कदाचित दिशा गवसेल.
कदाचित का? नक्कीच सापडेल.
तसा विश्वास आहे.