Balatkar Ek Samasya – Vanchit Vikas
https://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/07/cover-scaled.jpg

वंचित विकास संस्था गेली ३६ वर्षे स्त्रियांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी, अस्मितेसाठी काम करते. या स्त्रियांमध्ये अगदी तळातली शरीरविक्रय करणारी स्त्री, एकल महिला, विधवा, परित्यक्ता, अडचणीत सापडलेल्या स्त्रिया, यांच्याबरोबरच अनेक मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय स्त्रिया असे अनेक घटक येतात.

कै. विलास चाफेकर हे जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेचे संस्थापक आहेत.

स्त्रियांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उत्तर शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अनेक स्त्रियांच्या कहाण्यांचे ते विश्वासू श्रोता होते.

स्त्रियांच्या प्रश्नामध्ये बलात्कार व बलात्काराला बळी पडलेली स्त्री हा अतिशय संवेदनशील व मनाला जखमी करणारा, आयुष्य उद्ध्वस्त करणारा विषय आहे.

बलात्काराच्या अनेक बातम्या सतत वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर येत असतात. त्या बातम्यांच्या मागचे चेहरे, त्यांच्या यातना, त्याची कारणं समजून घेण्याचा कै. विलास चाफेकर यांनी प्रयत्न केला. सरांनी त्यांच्या शेवटच्या दिवसात या विषयाची परखड मांडणी केली. त्यांचे विचार स्पष्ट, स्वच्छ व समाज उपयोगी आहेत. कायम निर्भीडपणे ते विचार मांडत असत.

सरांच्या माघारी आम्ही त्यांचे हे लेखन ‘बलात्कार : एक समस्या’ या छोट्या पुस्तिकेतून आपल्यापर्यंत पोचवीत आहोत.