मथुराबाई राजहंस कृतज्ञता पुरस्कार – 2020-21
सप्रेम नमस्कार,
दोन वर्षापूर्वी राजहंस कुटुंबियांतर्फे कृतज्ञता पुरस्कार देण्यास सुरुवात केली.पहिला पुरस्कार २०१९ मध्ये चिखलगावच्या लोकमान्य सेवा न्यासच्या डॉ.राजा दांडेकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते देण्यात आला. मागील वर्षी कार्यक्रम होऊ शकला नाही.या वर्षीचा पुरस्कार विलास चाफेकर यांनी स्थापन केलेल्या ‘वंचित विकास’ या संस्थेस देण्यात येणार आहे.संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर आणि सुनीता जोगळेकर हा पुरस्कार स्वीकारतील. सुप्रसिध्द लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या रेणू दांडेकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत ‘सामाजिक कार्य आणि स्त्रिया’ या विषयावर या तीनही कार्यकर्त्या आपले विचार या प्रसंगी मांडतील कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सोबत पाठवीत आहे. आपण जरूर यावे ही विनंती.
मेधा राजहंस यशवंत राजहंस
मो.९८२२९१०९४० ९३२५४०४९७१