सुमनताई शिरवटकर पुरस्कृत अभिनय स्पर्धा 2021- – Vanchit Vikas
https://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/01/IMG_8301-scaled.jpg

सुमनताई शिरवटकर पुरस्कृत अभिनय स्पर्धा 2021-

Posted By :

वंचित विकास संस्थेच्या अभिरुची वर्ग आणि फुलवा प्रकल्पातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यावर्षीही सुमनताई शिरवटकर पुरस्कृत अभिनय स्पर्धा घेण्यात आली. कोविडच्या पाश्वर्भूमीवर काळजी घेऊन वेगळ्या पध्दतीने ही स्पर्धा दुपारी 1 ते 5 यावेळेत पुढील ठिकाणी घेण्यात आली.

  1. दि. 12 जानेवारी 2021- जनता संस्कुतिक हॉल,जनता वसाहत,पर्वती पायथा,पुणे.
  2. दि. 13 जानेवारी 2021- बुध्दविहार,अप्पर इंदिरानगर,बिबवेवाडी,पुणे.

130 मुलांनी यात सहभाग घेतला व नृत्य, फॅन्सी ड्रेस,गाण,नाटक अशा कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

श्रीमती वैष्णवी जोगळेकर,श्रीमती वरदा पटवर्धन व वैजयंती ठकार या स्पर्धेच्या परिक्षक म्हणून लाभल्या.फुलवाच्या समन्वयक श्रीमती तृप्ती फाटक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.स्पर्धेचे वेगळेपण असे कि, गर्दी होऊ नये म्हणून10 अभिरुची वर्ग व फुलवातील मुलांच्या  कार्यक्रमांचे दोन दिवासात विभाजन केले.प्रत्येक गटाला एक ठराविक वेळ दिली. वर्गांचे सादरीकरण झाल्यावर त्यांना परत पाठवले. प्रत्येक वर्गाच्या कार्यक्रमाला संस्थेचे कार्यकर्ते,मुले  व परीक्षक मिळून 15 ते 20 माणसे उपस्थित रहातील याची काळजी घेतली.

मुलांनी केलेले उत्तम सादरीकरण,हिंदुस्थान बेकरी तर्फे मिळालेला खाऊ,मुलांना स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल दिलेली भेटवस्तू यामुळे संपूर्ण कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पडला.