सन्मान नवदुर्गाचा-दिवस सातवा – श्रीमती स्नेहल मसालिया
कर्तृत्वशालिनी स्नेहल
श्रीमती स्नेहल मसालिया यांचा अभिरुची वर्गाचे संयोजन करणारी कार्यकर्ती ते निर्मळ रानवाराची व्यवस्थापक व कार्यकारी संपादक हा प्रवास अत्यंत कौतुकास्पद आहे. स्नेहल अभिरुची वर्ग व निर्मळ रानवाराचे काम पहाते. अत्यंत गुणी, मितभाषी व कलाकार असलेली स्नेहल मुलांना प्रिय आहे. या कार्यक्रमाला तिचे यजमान श्री सुनील मसालिया उपस्थित होते. त्यांच्या खंबीर पाठींब्यामुळे हे शक्य होते असे ती म्हणाली.
स्नेहलचे कौतुक पेशाने वकील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती ज्योती कुलकर्णी यांच्या हस्ते झाला.