सन्मान नवदुर्गाचा-दिवस चौथा – मीनल कुलकर्णी आणि मयुरी कुलकर्णी
स्त्री पुरुष हे समान दोघे, नाही फरक करणार किंवा मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान असे आपण म्हणतो. पण प्रत्यक्षात मुला-मुलींना समानतेने किती जण वाढवतात हा प्रश्नच आहे.
दोन्हीही मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांना आपल्या व्यवसायात भागीदार करून घेणाऱ्या चार्टर्ड अकौंटंट श्री जयंत कुलकर्णी यांच्या दोन समर्थ चार्टर्ड अकौंटंट कन्या श्रीमती मीनल कुलकर्णी आणि श्रीमती मयुरी कुलकर्णी यांचे कौतुकवंचित विकास संस्थेच्या स्नेही श्रीमती प्रतिभा गुंडी यांनी केले.
श्रीमती मीनल कुलकर्णी या कंपन्यांचे ऑडीट,जी एस टी,vat,सर्व्हिस tax, को.ऑप. सोसायटी, कार्पोरेट कंपनीअशी विविध कामेकरतात. त्या अनेक संस्था, ऑफिसेसशी सलग्न आहेत.
श्रीमती मयुरी कुलकर्णी यांनी इन्कमटॅक्स मधील litigation या विषयात विशेष प्राविण्य मिळविले आहे. तसेच सध्या त्या direct taxes या विषयामध्ये सखोल काम करीत आहेत.