सन्मान नवदुर्गाचा-दिवस तिसरा -दीपिका खांडे
दीपिका खांडे सिस्टरच्या सेवा कार्याला सलाम !
कोरोनाच्या काळात घराबाहेर पडायला जिथे लोक घाबरत असत तिथे दीनानाथ मंगेशकरसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे २ वार्ड सांभाळणाऱ्या levitra consegna rapida श्रीमती दीपिका खांडे या तरुण सिस्टरचे कौतुक मंगळवार दि.२० ऑक्टोबर २० रोजी डॉ. विभावरी सरदेशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
आपला रुग्णसेवेचा पेशा हीच ईश्वरसेवा मानून सिस्टर खांडे यांनी केलेले हे काम कौतुकास्पद व इतरांना प्रेरणा देणारे आहे.
आपण काही विशेष काम केले आहे असा अभिनिवेश न आणता अत्यंत सहजपणाने या काळातील अनुभव त्यांनी कथन केले. कोविडच्या या वैश्विक महामारीच्या काळात लोकांची सेवा करावयास मिळाली हे माझे भाग्य आहे असे त्या म्हणाल्या.


