संध्याकट्टा
संध्याकट्टा
वंचित विकास संस्थेचा ज्येष्ठ नागरिकांसाठी संध्याकट्टा आहे.
एप्रिल, मे व जून २० मध्ये या मैत्रिणीची लॉकडाऊनमध्ये मिटिंग घेणे शक्य झाले नाही. म्हणून आम्ही फोनवर सर्वांशी संपर्क साधला.
काही ज्येष्ठांच्या आलेल्या प्रतिक्रिया नमुन्यादाखल –
- विपुल कुलकर्णी – वय वर्ष ८०. दोन मुले परदेशात. पती-पत्नी एकटेच राहतात. लॉक डाऊनच्या काळात स्वयंपाकाची बाई नाही. खूप अडचणी होत्या. पण तुमचा फोन आला की खूप बोलावसं वाटते. हलके हलके वाटते. आधार वाटतो.
- कुमार पेंडसे – संध्याकट्टातून आठवणीने फोन येतो याचे खूप कौतुक वाटते. हल्ली कोणी कोणाला विचारत नाही.