मी मृत्यूला भितो !
मी मृत्यूला भितो !
विलास चाफेकर
चार-पाच जण गप्पा मारत असतात. कसं कोणास ठाऊक गप्पांचा विषय मृत्यूवर येतो. एक जण म्हणतो, लोक येव्हढे का घाबरतात मरणाला, कोणास ठाऊक. खरतर मृत्यू प्रत्येकाला येणारच. मृत्यू अटळ आहे. मृत्यू निश्चित आहे.
कालच whats appवर आलेले वाक्य वाचलं. मृत्यू म्हणजे विश्रांती, असं जर असेल तर सर्वानीच मृत्युच्या स्वागताची तयारी करायला हवी.
ते खर आहे. पण मृत्युची भीतच वाटते.
सहाजिकच आहे. एखाद्याच्या मृत्यूबद्दल संशय असला तर शवविच्छेदन करतात. ते पाह्यलंय कधी? सार शरीर फाडलेल, अधून मधून शिवलेलं, अंगावर काटाच येतो पाहताना.
अपघातात कोणी मेला, डोकं फुटलंय, आतड बाहेर आलय, हात तुटलाय… बस बस. नको वर्णन करूस. आम्ही पाह्यलंय.
ती तिरडी, तीवर लुटलुटती मन कलू नये म्हणून कपाळावरून बांधलेला काश्या – काय भयानक दिसत.
इतर धर्मानी तेव्हढ तरी बर असत. बॉडी शव पेटीतून नेतात. काही बीभत्स दिसत नाही.
पण तरी स्मशानात गेल्यावर भेदून जाणारी शांतता, अनेक जण असूनही कोणी कोणाशी बोलत नाही. सगळे चिडीचूप-गपगार-आवाज नाही. फक्त कुजबूज. ही कुजबूज प्रसंगाचं गांभीर्य आणखी वाढवते. छे; हा तो सर्व प्रकार आपल्या तर सहनशक्तीच्या पलीकडचा आहे.
पण.. प्रेमावर किती हार-फुले… एरवी फक्त लग्नात viagra ricetta एक हार गळ्यात पडतो. बाकी कधी कोण कशाला हार घालतोय ? मग त्यासाठी मरायला तयार आहेस का ?
पुन्हा सारे गप्प.
मध्यंतरी एका पुढाऱ्याच्या मृत्युनंतर शोकसभा झाली. त्याची बातमी पेपरात आलेली. सारा समाज पोरका झाला… म्हणजे काय झालं ? कोण झालं पोरकं ?
ते पुढाऱ्याच राहू दे. घरातला कर्ता माणूस मेला ते घरातली कच्ची बच्ची पोरकी होतातच की. त्यमुळे त्यांना खूप दु:ख होत.
धाय मोकलून रडतात. आपल्याविषयी किती प्रेम असत त्यांना ?
म्हणून आपण मरून पाह्यचं का ?
हट. ते काय शक्य आहे का ? आणि खरच किती दु:ख होतय हे पाह्यला आपण कुठे ह्यात असणार ?
आपण कोणासाठी, केव्हा, का रडतो. ते राहू दे बाजूला. कोणी आपल्यासाठी शोक करतो की नाही, तेही राहू दे बाजूला. आपण मृत्यूला घाबरतो. अगदी xxx आपली मृत्युनंतर होणारं देहाचं भीषण दर्शन…
त्यामुळे भीती वाटते.
मृत्यूमुळे घरातील माणसांची, नातेवाईकांची, शेजारपाजाऱ्यांची, परिचितांची मन काळवंडतात
म्हणून मरणाची भीती वाटते ?
इनजनरल मरणाची भीती वाटते की, तुला स्वतःला मरणाची भीती वाटते ? आहेस तू मरायला तयार ?
एकदम शांतता. चर्चेत एक pause येतो.
आयुष्याला कंटाळलेली एखादी जराजर्जर झालेली म्हातारी, सारखी, देवा मला सोडव रे, असा धोशा लावणारी सुद्धा वेळ आली की म्हणते अजून सूनमूख पाह्यचय, नातवाला जोजवायचाय… तेव्हा सारेच मृत्यूला घाबरतात. अगदी संतमंडळी सुद्धा. मृत्यूला भ्यायचं कारण काय ?
घरातील कर्तीसावरती, तरणी ताठी बाई गेली, पोराचे हाल पाहवत नाहीत. पण त्याचसाठी नवरा महिनाभराच्या आत दुसर लग्न करतो. कच्ची बच्ची देशोधडीला लागू नयेत म्हणून विधवा झालेली बाई सुद्धा काम करून पैसे मिळवू लागते. गरीब-श्रीमंत असं कोणीही असो. थोडे दिवस दु:ख गोंजारतात अन मग लागतात कामाला. कवींनी म्हणून ठेवलय ना, जन पळभर म्हणतील हाय हाय. मी जाता राहील कार्य काय ? कोरोनाचे आता सगळ्यांना हादरवून टाकलंय. पण लॉकडाऊन जरा सैलावू दे, माणस आपापल्या उद्योगाला लागतील.
खर तर जो जो जन्माला आलाय, त्याला / तिला एक ना एक दिवस जायचयं. जन्म जितका सत्य आहे, तितकाच मृत्यूही सत्य आहे. एक्झिट आहेच. ही सारी निसर्गाची किमया आहे. आपण बाकी काय वाटले ते करू पण निसर्गाचा एकही नियम आपण बदलू नाही शकत, पतझड आयी.. झाडांवरून वाळलेली पाने गळून पडतात. ती पुन्हा झाडाला होती तिथे चिकटवा बर. आहे शक्य ? उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेला रोखून दाखवता येईल ? पावसाच्या धो धो धारा पडायच्या थांबवता येतील ? माणूस कितीही सामर्थ्यवान झाला तरी सायंकाळच्या सुमारास मृद्गंध घेऊन येणारा वारा आपण थोपवू नाही शकत.
समजा, मी मेलो. माझ्या कच्च्या बच्यांच काय होईल ? बायको पोरांना आधार कोण देईल ? माझ्यावर अवलंबून असणारी माझ्या कारखान्यातील हजार माणस उपाशीपोटी राहणार नाहीत का ? तेव्हा नो. नको मरण कॅन्सल.
आयुष्यात निराशा आहे, दु:ख आहे, अतोनात यातना आहेत. या सगळ्यातून सुटका हवीयं? मृत्यू सर्वाच उत्तर आहे. आजारपणाच्या यातनातूनही मुक्तता होईल. आज आपले शेतकरी भाऊ कर्जबाजारी होऊन, चिंतेने बेजार होऊन आत्महत्या करताहेत. पण तो शेतकरी त्याच्या बायकोला, मुलाबाळांना संकटात ढकलूनच जातो ना ? किती शेतकरी बायकांनी आत्महत्या केल्यात ? फार कमी. का ? पुरुषांना संवेदना शक्ती आहेच. पण बायकांची संवेदनाशक्ती जास्त तीव्र आहे. दु:ख मला पाहवत नाही, मी जातो म्हणणारा पुरुष पलायनवादी ठरतो तर पुरुषासकट स्वतःच्या कर्तव्याला जागणारी स्त्री परिस्थिती बदलायला ठाम उभी राहते.
खर तर मृत्यू आपला सखा-सोयरा, जिवाचा साथी आहे. तरी आपण त्याच्याकडे पाठ का फिरवतो ? नोकरीत बढती मिळेल. उद्योगधंद्यात बरकत येईल. शेती सदाहरित बनेल. मी कपडे लत्ते, गाडी, घर घेईन. घरातल्या सर्वांचे लाड पुरवीन. मग मी त्यांना हवाहवासा वाटेन. माझ्या रक्षणाची ते परमेश्वराकडे प्रार्थना करतील. ज्याला तुम्ही भौतिक सुख म्हणता ते भौतिक असेल पण तेच खरे सुख आहे. त्यामुळे मी श्रीमंत होईन. अमाप मिळवून थोडेफार दान करीन. ज्याला त्याला मी कोणी मोठा आहे, याचे भान येईल. मी खराखुरा सुखी होईन.
हे जे भौतिक सुख मला हवय ते मृत्यू हिसकावून घेणार. म्हणून मला त्याची भीती. दुसर काय हो ? हे सुख हे खरच अक्षय सुख आहे का, हा भाग अलाहिदा.
मी श्रीमंत, मी मालक, मी सुखी.. राजा भिकारी, प्रजा भिकारी, मी मात्र सुखी.. दुम दुम दुमाक, दुम दुम दुमाक,.. बच्चे लोग ताली बजाव !