“निर्मळ रानवारा” एप्रिल २०२२
परीक्षा झाली असेल आणि आता काय करू मी? असा प्रश्न मुलांसमोर आणि पालकांसमोर उभा राहिला असेल ना? या महिन्याच्या “निर्मळ रानवारा” मध्ये मुलांना आवडतील अशा छान छान गोष्टी तर आहेतच,पण स्वतः हाताने करून बघण्यासाठी सुद्धा एक गंमत आहे. आणि हो,तुम्ही कुठे गावाला जाणार असाल तर तिथं कोणते पक्षी दिसले,त्यांची घरटी कशी होती हे सुद्धा बघत असणार ना? तुम्हांला माहीत आहे का? यावेळच्या “निर्मळ रानवारा” या मासिकात माळ भिंगरी बद्दल वाचायला मिळेल. ती घरटे कसे बांधते,त्याची डागडुजी कशी करते आणि हो अजून एक गंमत आहे तिच्या बद्दल ती मात्र तुम्हांला मासिकातच वाचायला हवी. तुम्ही मासिक वाचून आम्हांला कळवा,काय आवडले आणि काय नाही? मुख्य तर सांगायचं राहिलंच, तुम्ही जर चित्र काढत असाल तर तुमची चित्रे आमच्याकडे नक्की पाठवा.त्यातलं निवडक चित्र मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित केले जाते.बघा तुम्हांला आवडेल की नाही तुमचे चित्र असे मासिकाच्या मुखपृष्ठावर आलेले?



पण त्यासाठी मासिक घ्या आणि ते वाचा.