निर्मळ रानवाराचे उपक्रम
निर्मळ रानवाराचे उपक्रम –“वंचित विकास” संचालित “निर्मळ रानवारा” बालमासिक 4 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्रकाशित केले जाते.मार्च 2020 पासून कोविड 19,लॉकडाऊन यामुळे मासिक प्रकाशित करण्यासाठी अनेक अडचणी आल्या तरी या अडचणींना तोंड देत मासिकाचे काम सुरळीतपणे सुरु आहे.नियमित छापील अंक,जुलै 2020 पासून सुरु केलेला डिजिटल अंक एवढ्यापुरतेच काम मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या पध्दतीने रानवाराचे काम पुढे नेण्याचा प्रयत्न चालू आहे.जानेवारी 2021 कथाविशेषांकाकरिता बक्षिसपात्र कथा युट्युबवर प्रसारित करण्यात आल्या.श्री.विजयश्री गोडबोले यांच्या “अक्षर सुमन खवय्येगिरी आणि साहित्य” या युट्युब चँनलवरही “निर्मळ रानवारा” दिवाळी अंक 2020 मधील साहित्य प्रसारित झाल आहे.
https://photos.app.goo.gl/z3EmJtfHqv6fzUkB7
आणखी काही युट्युब चँनल रानवाराचे साहित्य प्रसारित करण्यासाठी उत्सुक आहेत.इतर काही मासिकातील चांगले लेख मुलांना वाचायला मिळावे या दृष्टीने रानवाराच्या नेहमीच्या अंकात आता छात्रप्रबोधन मासिकाच्या मदतीने QR कोड दिला जाणार आहे. हा कोड स्कँन केल्यास किशोर वयम छात्रप्रबोधन,ऋग्वेद,मुलांचे मासिक अशा मासिकातील निवडक साहित्य दर महिन्याला मुलांना वाचायला उपलब्ध होईल.