कोविड-19 धान्य वाटप मदत आणि समुपदेशन प्रकल्प – Vanchit Vikas

कोविड-19 धान्य वाटप मदत आणि समुपदेशन प्रकल्प

Posted By :

कोविड-19 मदत आणि समुपदेशन प्रकल्प
• संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेच्या विविध प्रकल्पाच्या अंतर्गत कमी आर्थिक गटातील किमान 1000 कुटुंबांना एक महिना पुरेल असे किराणामालाचे कीट देण्याचे योजिले आहे. या कीटमध्ये स्वच्छतेच्या आणि किराणामालाच्या 28 वस्तू आहेत.
• तसेच 100 छोटया व्यावसायिकांना परत व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
• या कालावधीमध्ये अनेकांचे व्यावसायिक आयुष्य विस्कटले गेले. आर्थिक प्रश्न निर्माण झाले, कौटुंबिक समस्या जाणवू लागल्या. यासाठी निराशेच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी समुपदेशन केंद्र ही चालवले जाते.