Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /nfs/c09/h03/mnt/128656/domains/vanchitvikas.org/html/wp-includes/pomo/plural-forms.php on line 210
रानवारा पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन - Vanchit Vikas

रानवारा पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन

Posted By : Team Vanchit

       वंचित विकास, गमभन संस्था आणि सुश्री फाउंडेशन तर्फे ‘रानवारा’च्या पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन सायकलवीरांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात बालचमूने पर्यावरण विषयावर नाट्यकृती सादर केल्या. वंचित विकासचे संस्थापक विलास चाफेकर,  संचालिका सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर, प्रकाश पारखी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना श्रीराम ओक यांची होती. 

‘रानवारा’ या लहान मुलांसाठीच्या मासिकाचे प्रकाशन छोट्या सायकलवीरांच्या हस्ते करण्यात आले. नऊ वर्षांची अमिरी शहा हिने पुणे ते पंढरपुर 160 किलोमीटर सायकल चालवली. विराज शहा याने पुणे ते पलीताना असा नऊशे किलोमीटरचा प्रवास सायकलवर केला. हे दोघे आणि सुजन नहार हा पझल बुद्धिबळात प्राविण्य असलेला सायकलवीर यांच्या हस्ते ‘रानवारा’च्या पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन झाले.  रसिक पुणेकरांनी भरलेले सभागृह, पर्यावरणविषयक जागृती करणारे लहान मुलांचे नाटुकले आणि मुलांच्या मासिकाचे मुलांच्याच हस्ते झालेले प्रकाशन हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

 

प्रसिद्धी

सकाळ (पुणे) Today: Click here

लोकसत्ता (पुणे): Click here

पुण्यनगरी

 

विश्वदर्पण

 

संध्या

 

सामना

 

Pune Metro

 

नवभारत

 

नवमहाराष्ट्र