जाधव कुटुंबियांसाठी धीरासाठी मोहीम – सकाळ पुणे शहर

Event Date : 25-03-2018

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव यांच्या कुटुबियांना धीर देण्यासाठी वंचित विकास संस्थेने राज्यभर सह्यांची मोहीम राबवली. या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. याबाबतचे निवेदन संस्थेतर्फे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा संचालिका मीना कुर्लेकर,सुनीता जोगळेकर,देवयानी गोंगले,मीनाक्षी नवले इ उद्धव भडसाळकर उपस्थित होते.’स्व-रुपवर्धिनी’चे शिरीष पटवर्धन व त्यांचे सहकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.