Image

पाटणबोरी केंद्रामध्ये ५० कीटचे वाटप

वंचित विकास संस्थेच्या चंडीकादेवी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, पाटणबोरी, जि.यवतमाळ मार्फत जीवनावश्यक वस्तूंचे किराणा मालाचे सुन्ना गावात १५ कीट,मांडवी-पिंपळखुटी गावात ४ कीट तर पाटणबोरी गावात 31 कीटचे वाटप जून २१ ते जुलै ०३ या कालावधीत करण्यात आले. प्राधान्यक्रमाने कीटचे वाटप विधवा,परित्यक्ता घरातील कर्त्या महिलांना करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र या...
By : Team Vanchit
Image

30 जून 2020 रोजी ‘स्वयंसेवी संस्था आॉनलाइन’ विषयी झालेला कार्यक्रम.

30 जून 2020 रोजी 'स्वयंसेवी संस्था आॉनलाइन' विषयी झालेला कार्यक्रम.याची बातमी महाराष्ट्र टाइम्स या वर्तमान पत्रात आली होती.
By : Team Vanchit

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘आपुलकी’ पुरस्कार प्रदान

      वंचित विकास संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त जाणीव संघटना आणि वंचित विकास यांच्या वतीने ससून रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते किरण कांबळे यांना ‘कै. सुचिता नाईक आपुलकी’ पुरस्काराने, तर पत्रकार कार्यकर्ता श्रीराम ओक यांना ‘कै. अरुणकुमार कोंडेजकर उत्तम कार्यकर्ता’ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.  सन्मानचिन्ह, मानपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी...
By : Team Vanchit

रानवारा पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन

       वंचित विकास, गमभन संस्था आणि सुश्री फाउंडेशन तर्फे ‘रानवारा’च्या पर्यावरण विशेषांकाचे प्रकाशन सायकलवीरांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात बालचमूने पर्यावरण विषयावर नाट्यकृती सादर केल्या. वंचित विकासचे संस्थापक विलास चाफेकर,  संचालिका सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर, प्रकाश पारखी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना श्रीराम ओक यांची होती.  ‘रानवारा’ या लहान...
By : Team Vanchit

जाणीव संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन( समय सारथी, 11 ऑगस्ट 2019 )

जाणीव संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती वाशी तहसीलवर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने जाणीव संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी नायब तहसीलदार स्नेहलता पाटील यांना निवेदन दिले.  या आंदोलनाला भारिप व भारतीय नवजवान सेना त्यांनी पाठिंबा दिला. या निवेदनात राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,  श्रावण बाळ सेवा योजना, संजय...
By : Team Vanchit

अभया मैत्री गट कार्यशाळेत डॉ. सुरेखा पंडित यांचे मार्गदर्शन (महाराष्ट्र टाइम्स)

"एकटे आहोत म्हणून खचून जाऊ नका. वस्तुस्थिती स्वीकारून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा."  वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे ‘एकटेपण पेलताना’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन केले होते. या कार्यशाळेत मीना कुर्लेकर यांनी एकटेपण समजून घेताना हे सत्र घेतले. डॉ. सुरेखा पंडित यांच्यासह उद्योजिका सिंधू महाडिक, डॉ. सागर पाठक...
By : Team Vanchit
Image

दै. सकाळ, टुडे – गुरुवार दि.१८ जानेवारी २०१८ – आठवण, ‘अभया’च्या माध्यमातून महिलांना आधारवड, मीना कुर्लेकर

ती दु:खात होती... तिच्या पतीचे निधन झाले होते... पोटचा मुलगा तिला विचारत नव्हता... डोळ्यात अश्रू अन हतबल असलेली ती माझ्याकडे आली. तिने आपले दु:ख आणि वेदना मला सांगितल्या. तिला व्यक्त होण्यासाठी एक माध्यम मिळाले. तेव्हाच ठरवले तिच्यासारख्या अनेक जणींसाठी काहीतरी करावे अन त्यातून आकाराला आला तो अभया गट. वंचित विकासच्या...
By : Team Vanchit

चंदूकाका सराफ सुवर्णपेढीची सामाजिक संस्थेला देणगी

चंदुकाका सराफ आणि सन्स प्रा.लि.सुवर्णपेढीच्या १२व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वंचित विकास संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी देणगी नुकतीच देण्यात आली. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांचे पुनर्वसन करण्याबरोबरच अन्य सेवाविषयक उपक्रम राबविणाऱ्या वंचित विकास या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेस चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचे संचालक अतुलकुमार शहा यांच्या हस्ते देणगीचा धनादेश सुपूर्द केला. संस्थेच्या कार्यवाह मीनाताई...
By : Team Vanchit