संस्कृती व समाज – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2017/12/photo-12.jpg

संस्कृती व समाज

Posted By : Vilas Chaphekar
खरं तर न मागता आपला जन्म होतो. अकल्पितपणे केव्हातरी आपला मृत्यु होतो. जन्म आणि मृत्यु ही दोन ढळढळीत सत्य आहेत. आणि मरेपर्यंत जगावेच लागते हे तिसरे सत्य. या तीन सत्यांमधली पोकळी भरुन काढावी, आयुष्याला अर्थ प्राप्त methandienone 50mg व्हावा म्हणून अनेक गोष्टी निर्माण झाल्या. त्या निर्माण करण्याची क्षमताही निसर्गानेच आपल्याला दिली. यातुन ज्या गोष्टी निर्माण झाल्या त्याला आपण संस्कृती म्हणतो.
आपला इतिहास, जो जिथे निर्माण होतो तो भूगोल, परिस्थितीला वळण लावणाऱ्या महान व्यक्ती, त्यांनी मांडलेले तत्वज्ञान, धर्म, परंपरा, चालिरीती, श्रध्दा, विचार, आचाराच्या पध्दती, भाषा, साहित्य, कला इत्यादी अनेकानेक गोष्टी संस्कृती या शब्दात सामावलेल्या असतात. ही एक अतिव्याप्त संकल्पना आहे, अनेक तुकडे जोडून बनवलेली गोधडी आहे. संस्कृती स्वत: चांगलीही नसते आणि वाईटही नसते.
मानवी समाज सतत बदलत आलेला आहे. आदिम पाषाणयुगीन समाज, कृषिनिष्ठ समाज, औद्योगीकरणानंतरचा समाज यात बदल होत आले. १९९० पासून भारतात आलेले नवीन आर्थिक धोरण
हे फारच परिणाम करणारे आहे. आर्थिक बदलांबरोबर सामाजिक व मानसिक बदल तीव्र स्वरुपात होत आहेत. होणार आहेत. १९९० पूर्वी व नंतरही याचा गांभीर्याने विचार झालेला नाही.
मूलभूत विज्ञानतील संशोधन फारच गतिशील झाले आहे. त्याचा परिणाम अपरिहार्यपणे तंत्रज्ञानावर होतो. मानवी जीवन त्यामुळे अमूलाग्र बदलत आहे. संस्कृतीची मोडतोड होणारच आहे. अशावेळी समाजाच्या हिताचे ते स्वीकारणे व त्याचा पुरस्कार करणे हिताचे आहे. मात्र मूल्येही सतत बदलत राहतील हे लक्षात घ्यावे लागेल. विचारसरणी दर ५-१० वर्षात बदलत जातील. देव, दैव व धर्म या संकल्पनांना प्रचंड हादरे बसतील. अशावेळी समाजाच्या हितासाठी नवी मूल्ये नव्या व्यवस्थेसह मांडावी लागतील. मात्र मला समजलेले सत्य हेच योग्य असा दुराग्रह बाळगून चालणार नाही. अभिनिवेष रहित विचार्वंतांची गरज आहे. कारण, निसर्गाच्या क्रीडेतली सत्य वेगळीच आहेत.