वंचित विकासचा कीट वाटपात १००० चा टप्पा पार – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2020/06/IMG-20200620-WA0019-1-2.jpg

वंचित विकासचा कीट वाटपात १००० चा टप्पा पार

Posted By :

 

(दि.११/०७/२०२०)

वंचित विकास, पुणे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या विविध प्रकल्पांच्या मार्फत २८ जीवनावश्यक वस्तूंचे किराणा मालाच्या  कीटचे वाटप एप्रिल ते जून या लॉकडाऊन काळात केले. या कीट मध्ये गहू, ज्वारी,साखर पासून आमसूल, खजूर, साबण इ. वस्तूंचा समावेश होता.

  • वंचित विकास, केंद्र कार्यालय,  पुणे मार्फत २६० कीट,
  • अभिरुची वर्ग प्रकल्प अंतर्गत पुण्यातील १० झोपडपट्टी भागात ६९३ कीट,
  • चंडीकादेवी प्रकल्प, पाटणबोरी जि.यवतमाळ मार्फत ५० कीट,
  • तर महिला सबलीकरण प्रकल्प, वाशी जि. उस्मानाबाद,२५ कीट,
  • सबला महिला केंद्र लातूर २५ कीट,
  • सुना जि. बीड यांच्यामार्फत २५ कीट,

या प्रमाणे  वाटप करण्यात आले.सदरील किराणा मालाच्या कीटचे वाटप प्राधान्यक्रमाने विधवा, परित्यक्ता, अडचणीत सापडलेल्या एकल महिला, वृद्ध दांपत्ये, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबे यांना करण्यात आले.