हडपसर कर्णबधीर विद्यालयात कीट आणि शैक्षणिक साहित्य वाटप.

Posted By : Team Vanchit

दि.२१/०८/२०२०

    वंचित विकास संस्थेने कोरोना च्या संदर्भात मदत करताना समाजातील सर्व घटकांचा विचार केलेला आहे. शुक्रवार दि. ७ ऑगस्ट रोजी सुऱ्हुद मंडळ, पुणे संचलित हडपसर कर्णबधीर विद्यालय, हडपसर येथे १० गरजू पालकांना २८ जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा मालाच्या कीट चे वाटप करण्यात आले. कीट वाटपाचा कार्यक्रम सकाळी ११.३० वा. संपन्न झाला. वंचित विकास मधील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अपर्णा गजेंद्रगडकर यांच्या हस्ते कीट वाटप करण्यात आले.

     सभागृहात कर्णबधीर विद्यार्थ्यांनी  काढलेली चित्रे, बनविलेल्या वस्तू अतिशय चांगल्या पद्धतीने भिंतीवर लावलेल्या होत्या. ओरीगामीचे नमुने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेलेया होत्या.

      अपर्णाताई यांनी मुलांच्या पालकांना कोरोना आजार, त्यापासून घ्यावयाची काळजी, याविषयी सविस्तर माहिती दिली आणि कार्यक्रमाचा समारोप झाला.

     गुरुवार दि. ६ ऑगस्ट रोजी हडपसर कर्णबधीर विद्यालयास खालील प्रमाणे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

 • फुलस्केप वह्या            ९० नग
 • १०० पानी वह्या           ३० नग   
 • शिसपेन्सिल बॉक्स          ७ नग      
 • चित्रकला वही ३६ पानी      १ नग
 • सराव वह्या               ३ नग
 • स्केचपेन पाकीट            १ नग
 • खोडरबर                  ६ नग
 • कॅम्लीन कंपास पेटी         १ नग
 • प्लास्टिक फुट पट्टी          १ नग
 •  पाटीवरील पेन्सील          १ पेटी
 • पाटी, बर्गे पाटी, स्पंज डबी    १ नग प्रत्येकी
 •  व्हाईट बोर्ड, पेन सह        १ नग
 • कलर बॉक्स, रंगपेटी        १ नग प्रत्येकी

या शैक्षणिक साहित्याच्या मदतीबद्दल सौ. जगताप, मुख्याध्यापिका यांनी आभार मानले.