http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2017/12/logo.jpg

प्रेरणा पथ उपक्रम

Posted By : Team Vanchit

प्रेरणा पथ उपक्रमाच्या माध्यमातून कारागृहातून बाहेर आलेल्या कैद्यांच्या आयुष्यात चांगले बदल व्हावेत, बाहेरच्या जगात आल्यावर नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी त्यांना मदत मिळावी यासाठी भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्रमंडळ या संस्था काम करीत असतात.  या वेळेस वंचित विकास संस्थेने व्यवसायासाठी अशा कैद्यांना भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्रमंडळ मार्फत मदत केली. जन्मठेपेची २१ वर्षे शिक्षा भोगून आलेल्या बंदिवानाला उपजीविकेसाठी गाय आणि कालवड देण्यात आली. हा कार्यक्रम दि.११ ऑक्टोबर रोजी शुभारंभ कार्यालय, डी.पी. रोड येथे संपन्न झाला.