जाणीव संघटनेच्या वतीने वाशी तहसीलच्या नायब तहसीलदार सुजाता हंकारे यांना निवेदन

Posted By : Team Vanchit

वाशी तालुक्यातील पिंपळगाव (लिं) येथील शासकीय गायरान जमीनीवर दलित मागास वर्गीय भूमीहीन यांनी पंधरा वर्षां  खालील पडीक जमीन लागवडीत आणून पिके काढून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते.परंतू 12/06/2020  रोजी गावातील समाजकंटक यांनी 30 ते 40 लोकांच्या  जमावाने शेतीची  नासाडी केली,  सामाजिक  संतुलन बिघडवले व गरिबांवर अन्याय  केला. जाणीव संघटनेच्या वतीने वाशी तहसीलच्या नायब तहसीलदार सुजाता हंकारे यांना निवेदन दिले यावेळी रामभाऊ लगाडे , शेषेराव गाडे व गायरान धारक शेतकरी दिसत आहेत .