Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /nfs/c09/h03/mnt/128656/domains/vanchitvikas.org/html/wp-includes/pomo/plural-forms.php on line 210
जाणीव संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन( समय सारथी, 11 ऑगस्ट 2019 ) - Vanchit Vikas

जाणीव संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन( समय सारथी, 11 ऑगस्ट 2019 )

Posted By : Team Vanchit

जाणीव संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती वाशी तहसीलवर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने जाणीव संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी नायब तहसीलदार स्नेहलता पाटील यांना निवेदन दिले.

 या आंदोलनाला भारिप व भारतीय नवजवान सेना त्यांनी पाठिंबा दिला. या निवेदनात राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,  श्रावण बाळ सेवा योजना, संजय निराधार योजना, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना याबाबत मागण्या नमूद केल्या आहेत. तालुक्यातील वृद्ध,  निराधार, गायरान धारक मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले. जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे, शेषराव गाडे, रामराव सांबरे,  हनीफ लोहार, भीमराव पवार आदींनी परिश्रम घेतले.