चंदूकाका सराफ सुवर्णपेढीची सामाजिक संस्थेला देणगी

Posted By : Team Vanchit

चंदुकाका सराफ आणि सन्स प्रा.लि.सुवर्णपेढीच्या १२व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वंचित विकास संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी देणगी नुकतीच देण्यात आली.
शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांचे पुनर्वसन करण्याबरोबरच अन्य सेवाविषयक उपक्रम राबविणाऱ्या वंचित विकास या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेस चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचे संचालक अतुलकुमार शहा यांच्या हस्ते देणगीचा धनादेश सुपूर्द केला.
संस्थेच्या कार्यवाह मीनाताई कुर्लेकर यांनी हा धनादेश स्वीकारला. महापौर मुक्त टिळक,संत साहित्याच्या अभ्यासक प्रा.आरती दातार, संस्थेच्या सुनीता जोगळेकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ आणि चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचे जनसंपर्क अधिकारी सुनील चोणकर या वेळी उपस्थित होते.
चंदुकाका सराफ आणि सन्ससारख्या दातृत्त्वाचा वारसा जपणाऱ्या व्यावसायिक संस्थांमुळे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थाना बळ मिळते,असे सांगून मुक्त टिळक यांनी वंचित विकास संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.