केंद्रकार्यालय आणि पाटणबोरी येथे झेंडावंदन संपन्न

Posted By : Team Vanchit

     वंचित विकास केंद्र कार्यालय, नारायण पेठ, पुणे येथे शनिवार दि.१५ ऑगस्ट२०२०  रोजी सकाळी ७ वाजता डॉ. श्रीकांत गबाले यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. सदरील कार्यक्रमात सर्व उपस्थित व्यक्तींनी सामाजिक अंतराचे पालन केले आणि सर्वांनी मुखपट्टी लावलेली होती. कार्यक्रमास २० कार्यकर्ते  उपस्थित होते.

तसेच, चंडीकादेवी कौशल्य विकास केंद्र, पाटणबोरी, जि.यवतमाळ या संस्थेत शनिवार दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता सौ. सुगणाताई कोरेवार यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. या कार्यक्रमास शिवणकाम आणि नर्सिंग सहायक या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तसेच सल्लागार मंडळातील सदस्य, हितचिंतक आणि पालक उपस्थित होते.