http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/01/WhatsApp-Image-2021-01-25-at-12.31.04-PM.jpeg

“अक्षरसेवा पुरस्कार”

Posted By : Team Vanchit

आज बुधवार दिनांक 21 जुलै 2021 रोजी पत्रकार भवन,पुणे. येथे संवाद पुणे आयोजित पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा  पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  लहान मुलांच्या क्षेत्रात कार्यरत राहून वाचनसंस्कृती वाढविणाऱ्या काही संस्थांना   “अक्षरसेवा पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार जेष्ट कवी श्री.रामदास फुटाणे व पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.प्रशांत जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.

या पुरस्कारासाठी वंचित विकासच्या “निर्मळ रानवारा”, तसेच “साधना” बालकुमार दिवाळी अंक, “किशोर”बालभारती, “छावा”  “चिकुपिकू” मासिक यांची निवड झाली.

संस्थेच्या वतीने रानवाराच्याविशेष संपादक श्रीमती ज्योतीताई जोशी व कार्यकारी संपादक श्रीमती स्नेहल मसालीया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

संपूर्ण रानवारा टीमचे मनापासून अभिनंदन!